Operation Ajay | भारत सरकारचे मोठे यश, इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले; सरकारचं ‘ऑपरेशन अजय’ सुरु | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Operation Ajay | भारत सरकारचे मोठे यश, इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले; सरकारचं ‘ऑपरेशन अजय’ सुरु | Navarashtra (नवराष्ट्र)


इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेऊन भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत २१२ भारतीय परत आले आहेत.

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेऊन भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत २१२ भारतीय परत आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण २१२ भारतीयांचा समावेश आहे.

मायदेशात परताच या भारतीयांनी सुटकेचा श्वास सोडला असून, मोदी सरकारचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर या नागरिकांचे स्वागत केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.






Source link