भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने फलटण शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

0
99

फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास श्रद्धापूर्वक वंदन करुन सूत्रपठनासह यामध्ये त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा, भिमस्मरण, भीम स्तुती सामुदायिकरित्या घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने ही बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते यांनी विनम्र अभिवादन केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु.महावीर भालेराव, सरचिटणीस आयु बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष आयु.विठ्ठल निकाळजे सर, संस्कार सचिव आयु.बजरंग गायकवाड सर, तालुक्याचे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे, फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव तथा बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते, संघटक आनंद जगताप, अमोल काकडे, प्रशांत सोनवणे, जेष्ठ प्रवचनकर सोमीनाथ घोरपडे सर, साहित्यिक तानाजी जगताप, आयु.सुरज भैमुले, आयु.नंदकुमार निकाळजे, आयुनि संगिता निकाळजे, धम्म उपासक अजय निकाळजे, विजय निकाळजे, आयुनि पारिजातका जगताप, आयुनि भाग्यश्री बजरंग गायकवाड, आयुनि भाग्यश्री विठ्ठल निकाळजे, आयुनि रजनी निकाळजे, निलाक्षी जगताप, तनिष्का जगताप, आरोही गायकवाड हे यावेळी उपस्थित होते.