Ole Aale Tariler: तुझ्याकडे भाकरवडी आहे, पुण्याची आहेस?; ‘ओले आले’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

0
17
Ole Aale Tariler: तुझ्याकडे भाकरवडी आहे, पुण्याची आहेस?; ‘ओले आले’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित


मराठीच नव्हे तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपला दबदबा निर्माण करणारे अभिनेते नाना पाटेकर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा ‘ओले आले’ हा हटके मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा आहे. हटके नावामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत होता. अखेर आज ‘ओले आले’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.



Source link