Ola Uber : २० फेब्रुवारीपासून पुण्यात ओला, उबरची सेवा राहणार बंद, कारण काय?

0
13
Ola Uber : २० फेब्रुवारीपासून पुण्यात ओला, उबरची सेवा राहणार बंद, कारण काय?


येत्या २० फेब्रुवारीपासून पुणे आणि चिंचवडमधील कॅब चालक कामबंद आंदोलन करणार आहेत. त्यादिवशी सकाळी ११ वाजता संगम ब्रिज जवळ आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालक एकत्रित येतील, अन् निदर्शने करणार आहेत. प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जाहीर केले असून १ जानेवारी २०२४ पासून नवीन दराची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र ओला, उबर कंपन्या या दराची अद्याप अंमलबजावणी करत नाहीत. परिणामी याचा फटका कॅब चालकांना बसत आहे. नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल. या भीतीने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अद्याप दराची अंमलबजावणी करत नाही, असा आरोप कॅब चालकांनी केला आहे.



Source link