
2019 च्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीने 113 जागा जिंकल्या होत्या. तर 23 जागा जिंकून भाजप प्रमुख विरोधी पक्ष ठरला आहे. 5 मार्च 2000 रोजी पहिल्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नवीन पटनायक 24 वर्षांनंतर मुख्यमंत्रिपद गमावत आहेत.
भुवनेश्वर : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्याच्या राजकारणात (Odisha Politics) अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात ओडिशात 24 वर्षांनंतर सत्तेत मोठे फेरबदल झाले आहेत. भाजपला ओडिशात पहिल्यांदाच चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपकडेच आता सत्तेची चावी दिसत आहे.
भगवान जगन्नाथाची भूमी ओडिशा वर्षांनंतर मोठ्या राजकीय बदलासाठी सज्ज आहे. राज्यातील 147 विधानसभा जागांसाठी झालेल्या मतमोजणीच्या ताज्या ट्रेंडनुसार राज्यात भाजप सरकार स्थापन करत असल्याचे दिसत आहे. भाजप 74 जागांवर आघाडीवर आहे. उत्तर ओडिशात पक्षाला चांगला जनाधार मिळाला आहे. ओडिशात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 74 आहे.









