
गेल्या ६ महिन्यांपासून कोरटाला शिवा या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. ‘एनटीआर ३०’ या चित्रपटासाठी अनेक नावांचा विचार करून, आता अखेर त्यांनी जान्हवीला साईन केले आहे. ‘एनटीआर ३०’ हा चित्रपट तेलुगुसह तमिळ, मल्याळम आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची शूटिंग २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, हा चित्रपट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.