Nobel Prize 2023 | रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, क्वांटम डॉट्सचा शोध लावणाऱ्या ‘या’ तिघांचा सन्मान | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Nobel Prize 2023 | रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, क्वांटम डॉट्सचा शोध लावणाऱ्या ‘या’ तिघांचा सन्मान | Navarashtra (नवराष्ट्र)


nobel prize in chemistry

तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे.

यंदाच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची (Nobel Prize 2023) घोषणा करण्यात आली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या मौंगी जी. बावेंडी, कोलंबिया विद्यापीठाचे लुईस ई. ब्रूस आणि नॅनोक्रिस्टल टेक्नोलॉजी या संस्थेत काम करणारे अ‍ॅलेक्सी आय. एकिमोव्ह या तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे रसायनशास्त्रातील पुरस्कार दिला जाणार आहे. क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने (The Royal Swedish Academy of Sciences) या पुरस्काराची घोषणा केली. Nobel Prize News)






Source link