
मुंबई : मोदी सरकारविरोधातील विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर आणला आहे. या प्रस्तावावर मतदान होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन्ही गटाने या संदर्भात व्हीप जारी केला आहे. अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी तर शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे खासदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे हे खासदार नेमके कुणाला मतदान करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.