
Nikita Rawal Robbery: बॉलिवूड अभिनेत्री निकिता रावल हिच्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेत्रीच्या घरी चोरी झाली असून, यात बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये चोरी करण्यात आले आहेत. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जेव्हा तिच्या घरी होती, तेव्हा तिच्या घरातील एका कर्मचार्याने बंदुकीचा धाक दाखवून तब्बल साडेतीन लाख रुपये लुटले आहेत. तर, या गुंडांची एक टोळी देखील होती, मागण्या पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी देत होती.जीवाच्या भीतीने निकिता रावल हिने त्यांना घरातील ऐवज दिला. दरोडेखोर हा तिच्या घरातील एक कर्मचारी होता, ज्याने त्याच्या टोळीतील इतर काही साथीदारांसह चोरीची योजना आखली होती.








