
कोण आहेत सदानंद दाते ?
मारठमोळे आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत आहेत. या काळात त्यांनी विविध पदांवर जबाबददारी सांभाळली. त्यांनी त्यांच्या अनुभव्यवर ‘वर्दीतील माणसांच्या नोंदी’ हे पुस्तक देखील लिहिले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पहिले होते. यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आयएएस, आयपीएस आणि IA&AS असे तीन पर्याय त्याच्या पुढे होते. मात्र, सदानंद दातेंनी आयपीएस हा पर्याय निवडला व पोलीस खात्यात भारती झाले. सदानंद दाते हे सध्या महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख आहेत. त्यांची आता एनआयएचे डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पूर्वी त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये डीआयजी तर केंद्रीय राखीव पोलीस दलात आयजी (ऑप) म्हणूनही काम केले आहेत मुंबईजवळील मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांचं पोलीस आयुक्तदेखील ते राहिले आहेत.