काय आहे नाटकाचा विषय?
सध्या जमाना ‘फिल्टर’चा आहे. एखादी गोष्ट अधिक छान असावी यासाठी ‘फिल्टर’ चा वापर केला जातो. नवे नाते निर्माण करताना किंवा असलेले नाते जपताना महत्त्वाचा असेलला ‘फिल्टर’ अर्थात, दृष्टिकोन व विश्वास आपण जाणीवपूर्वक निर्माण करतो का ? योग्यवेळी तो वापरतो का? हे बघणं ही तितकंच आवश्यक असतं हे दाखवणाऱ्या ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. या मुहूर्त प्रसंगी निर्माते प्रसाद कांबळी, अजय विचारे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. अंशुमन विचारे, हेमंत पाटील , सुवेधा देसाई या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत निनाद म्हैसळकर यांचे आहे. प्रकाश योजननेची जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे.
वाचा : ‘अमर फोटो स्टुडिओ’नंतर सखी-सुव्रत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या नाटकाची घोषणा!








