New Army Chief | लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी असणार पुढील लष्करप्रमुख; केंद्र सरकारने जाहीर केली नियुक्ती | Navarashtra (नवराष्ट्र)

0
1
New Army Chief | लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी असणार पुढील लष्करप्रमुख; केंद्र सरकारने जाहीर केली नियुक्ती | Navarashtra (नवराष्ट्र)


लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेदरम्यान विविध कमांड, कर्मचारी, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्त्यांमध्ये विशेष असे काम केले आहे.

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) हे भारतीय लष्कराचे पुढील लष्करप्रमुख असणार आहेत. याबाबतची नियुक्तीच केंद्र सरकारने जाहीर केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज सी. पांडे (Manoj C. Pande) यांच्या पदाचा कार्यकाळ या महिन्यातील 30 तारखेला संपणार आहे. त्यापूर्वीच ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यापूर्वी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. पण, लष्करप्रमुख जनरल मनोज सी. पांडे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळेच आता त्यांच्या जागी उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. नव्या लष्करप्रमुखांच्या सेवेचा कार्यकाळ 30 जून 2024 पासून सुरू होणार आहे. याबाबतचे निवदेनही जारी करण्यात आले.






Source link