
अभिनेत्रीला नव्हती आई होण्याची इच्छा!
अभिनेत्री नेहा पेंडसे हिला कधीच आई बनण्याची इच्छा नव्हती. या विषयी देखील नेहा पेंडसे या मुलाखतीत बोलली आहे. आई न होण्याच्या निर्णयाविषयी बोलताना नेहा पेंडसे म्हणाली की, ‘सुरुवातीला मला आई व्हायचं नव्हतं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर मात्र माझा हा विचार बदलायला लागला.’ नेहा स्वतःमध्ये झालेल्या बदलामुळे हैराणही झाली होती. मात्र, तिची आई होण्याची इच्छा प्रबळ झाली होती. यावर तिने तब्बल ८ महिने विचार केला. मात्र, तिला इतक्यात आई व्हायचे नाही. यासाठी तिने ‘एग्ज फ्रीज’ करण्याची प्रक्रिया करून घेतली. यात तिचा पती शार्दुल याने देखील नेहाची साथ दिली.






