
अभिनेत्री नीतू कपूर या चित्रपटसृष्टीपासून लांब असल्या तरी कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या वागणूकीमुळे तर कधी वक्तव्यामुळे. सध्या नीतू कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर हा त्याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील रणबीर आणि तृप्तीचे इंटिमेट सीन्स सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. चित्रपटात रणबीर आणि तृप्तीचे विवाहबाह्यसंबंध दाखवण्यात आले आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा नीतू कपूर यांनी पती ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मोठा खुलासा केले होता.







