NEET-PG Exam: NEET-PG प्रवेश परीक्षा स्थगित; परिक्षेच्या 11 तासांपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

0
48
NEET-PG Exam: NEET-PG प्रवेश परीक्षा स्थगित; परिक्षेच्या 11 तासांपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय



नुकतंच नीटचा पेपर फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं पहायला मिळालं. अशातच रविवारी होणारी नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परीक्षा होण्याच्या अवघ्या ११ तास अगोदर सरकारने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्पर्धात्मक परीक्षांच्या पेपर लीकच्या आरोपांच्या अलीकडच्या घटना लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतलेल्या NEET-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link