Neena Kulkarni Serial: छोट्या पडद्यावर पुन्हा एका नव्या मालिकेची एंट्री! नीना कुळकर्णींचं धमाकेदार कमबॅक

0
20
Neena Kulkarni Serial: छोट्या पडद्यावर पुन्हा एका नव्या मालिकेची एंट्री! नीना कुळकर्णींचं धमाकेदार कमबॅक


आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या ज्येष्ठ दिग्गज अभिनेत्री नीना कुळकर्णी या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या आधी नीना कुळकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक मालिका गाजवल्या आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून त्या मोठ्या पडद्यावर व्यस्त असल्याकारणाने छोट्या पडद्याकडे फारसे लक्ष देऊ शकल्या नव्हत्या. आता ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून पुन्हा एकदा नीना कुळकर्णी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तर, या मालिकेच्या प्रोमोमध्ये नीना कुळकर्णी यांना एका प्रेमळ आईच्या भूमिकेत पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील या नव्या मालिकेसाठी आतुर झाले आहेत. ‘ऐक ना जनाचं, ते ऐक ना मनाचं…’ अशी टॅगलाईन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका एका हटके विषयावरती आधारित असणार आहे.



Source link