
Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ हे नाव कायम राहील, असे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने एका आठवड्याच्या आत चिन्ह बहाल करण्याचे आदेश दिले.






