
आपल्या आईकडून कलेचा सक्षम वारसा घेऊन अभिनेत्री नयना आपटे यांनी मालिका, चित्रपट, रंगभूमी, डबिंग अशी चौफेर मुशाफिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या कर्तबगारीने यश, कीर्ती मिळवीत असताना अभिनेत्री नयना आपटे यांनी अनेक अडथळे पार केले. त्यांच्या आयुष्याचा आणि कलेचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. हा प्रवास आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचला असून, त्यांच्या या कला प्रवासाचे साक्षीदार होण्याची संधी रसिकांना ‘अमृतनयना‘ च्या रूपाने मिळणार आहे.







