
नवाजने शेअर केलेल्या निवेदनात म्हटले होते की, त्यांचा आणि आलियाचा घटस्फोट झाला आहे आणि मुलांच्या भविष्यासाठी ते दोघेही परस्पर संमतीने एकत्र राहत आहेत. याशिवाय गेल्या २ वर्षांपासून शाळेची फी, औषध फी आणि इतर खर्चासाठी दरमहा १० लाख रुपये देत असल्याचेही त्याने सांगितले होते. नवाजुद्दीनच्या या स्पष्टीकरणानंतर आता पुन्हा एकदा आलियाने पलटवार केला आहे.