
बेकरी चालवणाऱ्या मोहित्यांच्या घरातली लीला, तर मोठा उद्योगपती असलेला अभिराम जहागीरदार यांची जोडी कशी जमणार आणि यांची जोडी जमताना काय गंमतीजमती पाहायला मिळणार, याची एक झलक या पहिल्याच एपिसोडमधून प्रेक्षकांना मिळाली आहे. मध्यमवर्गीय घरात जन्मलेली लीला हिच्या कुटुंबाचे छोटीशी बेकरी आहे. लीला याच बेकरीत कामदेखील करते. दुसऱ्याची मदत करायला धावून जाण्याचा स्वभाव असणाऱ्या लीलाला दरवेळी कुठला ना कुठल्या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. शुद्ध मनाने मदत करण्यासाठी निघालेली लीला नेहमीच कोणत्यातरी अडचणीत सापडते. ती जो प्रश्न सोडवायला जाते, तो प्रश्न सुटणार ऐवजी आणखी गुंतून जातो.








