Navri Mile Hitlarla: मी राकेश बापटला पाहिलं अन्…; वल्लरीने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

0
14
Navri Mile Hitlarla: मी राकेश बापटला पाहिलं अन्…; वल्लरीने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा


पुढे वल्लरीने राकेश बापट बरोबरची पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. “माझी पहिली भेट त्यांच्यासोबत एका लुक टेस्टसाठी झाली होती. मला टेन्शन तर होतच कारण लीलाचे खूप डायलॉग आहेत आणि त्यात राकेश बापट तुमच्या समोर आहेत तर प्रेशर तर होते कारण केमिस्ट्री मॅच झाली तरच लोकांना मालिका पाहायला आवडेल. पण त्यांना जेव्हा भेटले तेव्हा कळले की ते अतिशय साधे आहेत. आमचे लुक टेस्ट ही छान झाले. लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम मिळत आहे, म्हणून माझी उत्सुकता अजून वाढली आहे. मला तुम्हाला लीलाच्या प्रोमोचा किस्सा सांगायला अवढेल. लीलाच्या प्रोमो मध्ये तुम्हाला तिच्या बद्दल खूप काही गोष्टी कळतील. मी प्रोमो मध्ये दही हंडी फोडली आहे आणि स्कुटी ही चालवली आहे. स्कुटी तर मला चालवता येते पण माझ्यासाठी आव्हानात्मक गोष्ट म्हणजे दही हंडी फोडणे. सर्वात महत्वाचे सांगायचे तर हंडी फोडताना जे माझी मदत करत आहेत ते खरे गोविंदा पथक आहे. प्रचंड उत्साही माहोल होत प्रोमो शूटच. लीला खूप धांदरट आहे पण तिचा उद्देश चांगला आहे, तिला सगळ्यांची मदत करायची असते. तर जशी लीला आहे तसाच तिचा प्रोमोही रंगतदार आहे. जस अभिराम जहागीरदारला पाहून तुम्हाला कळले असेल की तो अतिशय शिस्त प्रिय आहे, तसेच लीलामध्ये तुम्हाला एक दिलखुलास-बिंधास्त मुलगी पाहायला मिळेल” असे वल्लरी म्हणाली.



Source link