
कोणते कलाकार दिसणार?
राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, वैभव मांगले, निर्मिती सावंत, जयवंत वाडकर, हेमल इंगळे, संतोष पवार आणि अली असगर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सचिन पिळगावकर यांनी केली आहे. लवकरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.








