
रमा काही नव्या शक्ती घेऊन पृथ्वीवर परतली असली, तरी तिच्या काही शक्ती या नाहीशा झाल्या आहेत. रमा आनंदीशी बोलू शकत असली, तरी तिला आनंदीला स्पर्श करता येणार नाहीये. मात्र, भावनांच्या माध्यमातून त्या दोघी एकमेकींचं सांत्वन करत आहेत. आता रमा आनंदीला प्रोत्साहन देऊन पुन्हा एकदा आयुष्य नव्याने जगण्याची प्रेरणा देणार आहे. तर, आनंदी देखील रमाचा सल्ला मानून आता विधिलिखित बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच तिच्या आयुष्यात आशेचा किरण येणार आहे.






