
राघव आणि आनंदी यांच्या सुखी संसाराला नुकतीच सुरुवात झाली होती. मात्र, त्यांच्या या संसाराला आधीच कुणाची तरी वाईट नजर लागली आहे. राघव आता एका मोठ्या संकटात अडकला आहे. राघव ज्या ऑफिसमध्ये काम करत होता, त्याच ऑफिसमध्ये काम करणारी एक मुलगी योजना हिने राघववर अनेक गंभीर आरोप लावले. राघवच्या ऑफिसमध्ये नव्यानेच रुजू झालेली योजना नावाची ही मुलगी राघवचा बदल घेण्यासाठी त्यांच्या आयुष्यात आली आहे. मात्र, राघवला याची तसूभरही कल्पना नव्हती. घरापासून दूर राहणाऱ्या योजनाला राघवने आपली लहान बहीण मानले होते. अगदी लहान बहिणीप्रमाणे त्याने योजनाची मदत केली होती.








