
विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये एकूण ७ ते ८ मुलींना दाखवण्यात आले आहे. मात्र कोणीही या प्रश्नाचे अचून उत्तर दिले नाही. एका मुलीने तर राष्ट्रीय गीत अरिजित सिंह यांनी लिहिल्याचे सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान अन्य अनेक मुली म्हणतात की, राष्ट्रीय गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. एका मुलीने तर म्हटले की, मला माहिती नाही की, राष्ट्रीय गीत काय आहे. दरम्यान दोन तरुणींनी म्हटले की, कदाचित बंगालच्या कोणत्यातरी व्यक्तीने हे लिहिले आहे. मात्र आम्हाला त्यांचे नाव आठवत नाही. त्याचबरोबर अनेक लोकांनी रविंद्रनाथ टागोर यांचे नाव लिहिले.








