National Politics: ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देणाऱ्यांच्या कानाखाली वाजवा; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

0
16
National Politics: ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देणाऱ्यांच्या कानाखाली वाजवा; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान


कोप्पल जिल्ह्यातील करातगी येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना शिवराज तंगदागी म्हणाले की, मागील १० वर्षात खोटी आश्वासने देऊन कारभार केला आहे. त्यामुळे त्यांना वाटते की, पुढच्या पाच वर्षातही जनतेला मूर्ख बनवले जाऊ शकते. मोदींनी देशात १०० स्मार्ट शहरांचे आश्वासन दिले होते. ते कुठे आहेत?  एका शहराचे नाव सांगा. ते स्मार्ट आहेत, चांगले कपडे परिधान करतात, वक्तृत्व चांगले आहे, ते आपला पोशाख सतत बदलत राहतात. कधी कधी त्यांचे स्टंट समोर येतात. कधी ते समुद्राच्या तळाशी जातात व तेथे पूजा करतात. एका पंतप्रधानाने अशी कामे करावी का?



Source link