National Politics | अरूणाचलमध्ये भाजपला मोठा दिलासा; निवडणूक न लढवण्याची ‘एनपीपी’ने केली घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
National Politics | अरूणाचलमध्ये भाजपला मोठा दिलासा; निवडणूक न लढवण्याची ‘एनपीपी’ने केली घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)


अरूणाचलमध्ये भाजपला मोठा दिलासा; निवडणूक न लढवण्याची ‘एनपीपी’ने केली घोषणा

एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या घोषणेचे समर्थन करताना अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी त्यांचा पक्ष राज्यात लोकसभेचे उमेदवार उभे करणार नाही आणि भाजप उमेदवारांना पाठिंबा देईल, असे सांगितले.

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीत 370 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांना अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) चा पाठिंबा मिळाला. एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या घोषणेचे समर्थन करताना अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी त्यांचा पक्ष राज्यात लोकसभेचे उमेदवार उभे करणार नाही आणि भाजप उमेदवारांना पाठिंबा देईल, असे सांगितले.

एनपीपी हा केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग आहे. सीएम संगमा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर म्हणाले, नॅशनल पीपल्स पार्टीने अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांवर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एनडीएमध्ये भागीदार असल्याने एनपीपीच्या राष्ट्रीय समितीने अरुणाचल प्रदेशातील एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.






Source link