
अल्लू अर्जुनने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, “मी खूप आनंदी आहे आणि मला दुप्पट आनंद होत आहे कारण हा पुरस्कार एका व्यावसायिक चित्रपटासाठी मिळत आहे.” दरम्यान, अल्लूने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. त्यावर काळ्या रंगाचा चष्मा लावला.








