
दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिवस (National Farmer’s Day) साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जंयतीनिमित्त राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जातो. या दिवशी कृषी क्षेत्रात नवनवीन गोष्टी आणून आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे ध्येय्य हा दिवसा साजरा करण्यामागे असतो. आजच्या किसान दिनाचे औचित्य साधून गोदरेज अॅग्रोव्हेट कंपनीने ‘किसान से हम है’ नावाची एक ब्रँड फिल्म रिलीज प्रदर्शित केली आहे. देशातील नागरिकांचे पोट भरण्यामध्ये देशातील शेतकऱ्यांची अविभाज्य भूमिका असते. शेतात अहोरात्र राबून नागरिकांची अन्नाची भूक भागविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘किसान से हम है’ हा लघुपट तयार करण्यात आला आहे.







