Nashik Video : अंजनेरीवर पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस; हनुमान मंदिरासमोरच तरुणाईचा ‘धांगडधिंगा’

0
18
Nashik Video : अंजनेरीवर पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस; हनुमान मंदिरासमोरच तरुणाईचा ‘धांगडधिंगा’


Nashik Anjneri : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर परिसराला निसर्गाचे कोंदण लाभलं असून सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्र्यंबकेश्वरसह पहिने अंजनेरी गडावर भाविकांसह पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. मात्र दुसरीकडे पर्यटनाच्या नावाखाली गडाचे पावित्र्य न राखता त्या ठिकाणी हुल्लडबाजी करून धुडगूस घातला जात आहे. थेट हनुमान मंदिराच्या (Hanuman Mandir) समोरच तरुणाईचा धांगडधिंगा पाहायला मिळत आहे. 

नाशिकपासून (Nashik) अवघ्या काही अंतरावर असलेल्या अंजनेरीसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसर हिरवाईने नटला असून पर्यटकांची पावले नाशिकचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकच्या दिशेने वळू लागली आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. येथील अंजनेरीसह ब्रम्हगिरीच्या डोंगर कड्यांनी हिरवा शालू पांघरल्याचे चित्र दिसून येत आहे. चहुबाजूंनी वेढलेल्या सह्याद्री पर्वत रांगेने हिरवाईचा साज चढवला आहे. फेसाळणारे धबधबे, चिखलाच्या अनवाणी वाटा, फुलांनी बहरलेले डोंगर यामुळे पर्यटकांचे गर्दी होऊ लागली आहे. यात तरुणाईचा अधिक सहभाग असून निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी निसर्ग पायदळी तुडविण्याचे काम पर्यटकांकडून सुरु असल्याचे चित्र आहे. 

नाशिक जवळचा अंजनेरी गड (Anjneri Gad) हा हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात हा परिसराला देखणे स्वरूप प्राप्त होते. पायथ्याला असलेल्या हनुमान मंदिरापासून ते पायऱ्या, निसरड्या वाटांनी दोन तासांचे अंतर कापल्यानंतर सुरवातीला अंजनीमाता माता मंदिर आणि त्यानंतर हनुमान मंदिराजवळ पर्यटक पोहचतात. यात अबालवृद्धांसह पर्यटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यातही तरुणाईची संख्या जास्त असते. अशावेळी तरुणाईकडून धांगडधिंगा केला जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. शनिवार रविवारच्या विकेंडला मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा गड गडावर जाताना दिसून येतो. मात्र त्यांच्याकडून गडाचे पावित्र्य जपले जात नाही. पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस घातला जातो. 

अंजनेरी गडावर हनुमानाचे मंदिर असून या मंदिराबाहेर तरुणाईकडून नाचगाणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. आजूबाजूच्या स्थानिक दुकानदार देखील याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे हनुमान मंदिर दर्शनासाठी येत असताना दुसरीकडे अशा पद्धतीने मंदिराबाहेरच तरुण तरुणींसह धांगडधिंगा केला जात असल्याने गडाचे पावित्र्य राखले जात आहे का? असं प्रश्न उपस्थित होतो आहे. 

गडावर जाण्यासाठी 30 रुपये आकारणी 

एकीकडे शनिवार रविवार विकेंड म्हटला की मोठ्या प्रमाणावर अंजनेरी गडावर पर्यटकांची गर्दी होत आहे. पायथ्याला असलेल्या पार्किंगसह गडावर जात असताना देखील पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे पहिला टप्पा पार केल्यानंतर देखील वाहन पार्किंग असून या ठिकाणी प्रत्येकी तीस रुपये दर आकारणी केली जात आहे. त्यामुळे दिवसाला हजाराहून अधिक पर्यटकांची गडावर होत असताना अशा पद्धतीने पार्किंग फी घेतली जात असल्याचे चित्र आहे. 

 

ईतर संबंधित बातम्या : 

Nashik Anjneri Hanuman : हनुमान जयंती : अंजनेरी हनुमानाचं जन्मस्थान, गडावर अंजनी मातेचं मंदिरही, काय आहे नेमका इतिहास? 

 





Source link