
शपधविधी सोहळ्यावेळी राष्ट्रपती भवन येथे प्राणी दिसून आला. या प्राण्याबाबत दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
दिल्ली : रविवारी (दि.09) रोजी एनडीएने सरकार स्थापन करत मंत्रीपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याची जोरदार चर्चा झाली. त्याचबरोबर शपथविधी सोहळ्यावेळी मागून एक प्राणी जात असल्याची व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. यामुळे चर्चांना उधाण आले. अनेकांनी राष्ट्रपती भवनामध्ये बिबट्या असल्याच्या चर्चांना वेग आला. यानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
शपथविधीवेळी दुर्गादास उइके मंत्रीपदाची शपथ घेत असताना मागू प्राणी जात असल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये असलेला हा प्राणी जंगली असून बिबट्या असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर अनेकांनी भीती व्यक्त केली. हा प्राणी बिबट्या असल्याची शक्यता वर्तवली जात असून यावर ठोस उत्तर दिले गेले नव्हते. याची व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर अखेर दिल्ली पोलिसांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा प्राणी कोणता आहे ते स्पष्ट केले. तसेच यापासून कोणताही धोका नाही याबाबत आश्वस्त केले.








