Narendra Modi | मतदानानंतर नरेंद्र मोदींचं ‘खास’ ट्वीट; व्यक्त केल्या भावना | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Narendra Modi | मतदानानंतर नरेंद्र मोदींचं ‘खास’ ट्वीट; व्यक्त केल्या भावना | Navarashtra (नवराष्ट्र)


मतदानानंतर नरेंद्र मोदींचं ‘खास’ ट्वीट; व्यक्त केल्या भावना

लोकसभा निवडणुकीसाठीचे एकूण सात टप्प्यांतील मतदान आता संपले आहे. आता सर्वांना 4 जून रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी ट्वीट्स केले आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीसाठीचे (Election) एकूण सात टप्प्यांतील मतदान आता संपले आहे. आता सर्वांना 4 जून रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी ट्वीट्स केले आहेत.

शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या निवडणुकीत संपूर्ण भारताने मतदान केले आहे. ज्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मतदारांचा सक्रिय सहभाह हा आपल्या लोकशाहीसाठी फार महत्त्वाचा घटक आहे. मतदारांचे समर्पण आणि वचनबद्धता यामुळे आपल्या देशातील लोकशाहीची भावना सुनिश्चित होते. देशातील महिला तसेच तरुणांचे मी विशेष कौतुक करू इच्छितो. त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.





Source link