Narendra Modi | “गांधींना कोणी ओळखत नव्हतं, जेव्हा चित्रपट बनला तेव्हा…,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत | Navarashtra (नवराष्ट्र)

0
7
Narendra Modi | “गांधींना कोणी ओळखत नव्हतं, जेव्हा चित्रपट बनला तेव्हा…,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत | Navarashtra (नवराष्ट्र)


“गांधींना कोणी ओळखत नव्हतं, जेव्हा चित्रपट बनला तेव्हा…,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत

देशात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता येत्या 1 जूनला पार पडणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहिर होणार आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच एक विधान चर्चेत आलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला घोषित होणार आहे. याचदरम्यान सर्व राजकीय पक्ष आपल्याच जागा जिंकणार असल्याचा दावा करतांना दिसत आहे. तर राजकीय नेते वृत्त माध्यमांना मुलाखतीतून आपली भूमिका मांडतांना दिसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आहे.

या मुलाखती दरम्यान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, महात्मा गांधींवर पहिला चित्रपट तयार झाला तेव्हा जगभर गांधींबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. यापूर्वी त्यांना कोणी ओळखत नव्हते. गांधींचे विचार जगभर पोहोचवण्यासाठी गेल्या 75 वर्षांत आपण काहीही केले नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.






Source link