
‘निवडणुकीचे निकाल आले तेव्हा मला अनेकांचे फोन येत होते. आकडे सांगितले जात होते. मात्र, मी त्यांना एकच प्रश्न विचारला की ईव्हीएम जिवंत आहे की मेलं? कारण भारतीय लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडावा असाच विरोधकांचा प्रयत्न होता. यावेळी मला वाटलं ते ईव्हीएमची अंत्ययात्राच काढतील. मात्र, ४ जूनच्या संध्याकाळी ईव्हीएमनं सगळ्यांना गप्प केलं. ही भारतीय लोकशाहीची, निवडणूक यंत्रणेची ताकद आहे, असं मोदी म्हणाले.







