
नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील सुविधा अपूर्ण आहेत तसेच अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात २० जागांची क्षमता असताना ८४ बालके उपचार घेत असल्याचा प्रकार आमदार पाडवी यांनी समोर आणला आहे. बालकांच्या अतिदक्षता विभागात एका पेटीत एक बालक ठेवलं जातं, मात्र तिथं चार ते पाच बालके अॅडमिट केले जात आहेत.जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि अपूर्ण सुविधा यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचा आरोपही पाडवी यांनी केला आहे.






