Nalasopara : तळहातावर सुसाईड नोट लिहून विवाहितेने संपवलं जीवन, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
19
Nalasopara : तळहातावर सुसाईड नोट लिहून विवाहितेने संपवलं जीवन, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


पती नितीश कुमार, सासू आशा कनोजिया, सासरा शिवसेवक कनोजिया आणि जाऊबाई माला कनोजिया अशी आरोपींची नावे आहेत. संगीता हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे स्वत:च्याच शरीरावर लिहिलं. माझ्या मृत्यूला माझा पती, सासू, सासरे आणि वहिनी जबाबदार असतील, असंही विवाहितेने लिहून ठेवलं. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.



Source link