
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील सक्करदऱ्यात एक कुटुंब आरोपी प्रतिक आसोलेच्या मालकीच्या घरात भाड्याने राहत होतं. आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले असता आरोपीने संधी साधत मुलीचं तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय या प्रकरणाची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पीडित मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना घडलेला सारा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रतिक आसोले याच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी प्रतिक आसोले हा अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवून होता. तिचे आई-वडील बाहेर गेलेले असल्याचं समजताच त्याने घरात घुसून मुलीवर अत्याचार केल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे.






