
Happy Birthday Nagma: वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी बॉलिवूड डेब्यू करून अवघं मनोरंजन विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून नगमाचं घेतलं जातं. आज (२५ डिसेंबर) नगमाचा वाढदिवस आहे. अभिनेत्री नगमा या नावाने जरी प्रसिद्ध असली, तरी तिचे खरे नाव नंदिता अरविंद मोरारजी असे आहे. नगमाची आई मुस्लिम तर, वडील हिंदू होते. नाताळच्या दिवशी जन्मलेल्या नगमाने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात हक्काचे स्थान निर्माण केले होते. अभिनेता सलमान खान याच्यासोबत पहिला चित्रपट करणाऱ्या नगमाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच तिने राजकारणात प्रवेश घेऊन मनोरंजन विश्वाला रामराम ठोकला होता. या दरम्यान नगमा आणि एका प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या अफेअरच्या चर्चा देखील जोरदार रंगल्या होत्या.






