
नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षीच ‘नाळ २’ या चित्रपटाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. बरोबर एका वर्षानंतर त्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज करून सगळ्यांनाच एक सुखद धक्का दिला आहे. या टीझरमध्ये आता प्रेक्षकांना मोठ्या चैत्यनसह एक सुंदर निसर्गरम्य परिसर देखील पाहायला मिळाला आहे. ‘मी माझ्या खऱ्या आईकडे चाललो’, असं म्हणून निघून गेलेला चैतन्य आता खरंच त्याच्या आईकडे पोहोचला आहे की, आणखी कुठे हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. ‘नाळ २’ या चित्रपटाचा टीझर अतिशय सुरेख आहे. टीझर पाहून आता प्रेक्षकांची आतुरता आणखी वाढली आहे.






