
बालकलाकार मायरा वायकूळ ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मायरा वायकूळ लहान असल्याने तिचे आई-बाबा हे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळत असतात. तर, आपल्या लाडक्या लेकीचे क्युट फोटो आणि व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता त्यांनी मायरच्या अकाऊंटवर आपल्या घरातील गणपती विसर्जनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली मायरा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना दिसली आहे. यावेळी मायराच्या बाबांनी तिला उचलून घेतले आहे. तर, लहानगी मायरा हमसून हमसून रडताना दिसत आहे.







