MyLek Teaser: सोनाली खरेची लेकीसोबत ऑनस्कीन धमाल; ‘मायलेक’चा टीझर प्रदर्शित

0
20
MyLek Teaser: सोनाली खरेची लेकीसोबत ऑनस्कीन धमाल; ‘मायलेक’चा टीझर प्रदर्शित


Sonali Khare Daughter Debut: सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची हवा पाहायला मिळते. सुहाना खान, खुशी कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, आगस्त्य नंदा, न्यासा देवगण, पलक तिवारी, इब्राहिम अली खान हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. अशातच आता एका मराठमोळ्या स्टारकिडचे पदार्पण होणार आहे. ही स्टारकिड आईसोबतच स्क्रीन शेअर करणार असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी आता मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘मायलेक’ असे आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.



Source link