MVA PC : ‘व्होट जिहाद’चा आरोप करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरे यांचं सडेतोड उत्तर, मोदींच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या!

0
15
MVA PC : ‘व्होट जिहाद’चा आरोप करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरे यांचं सडेतोड उत्तर, मोदींच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या!


‘नरेटिव्ह’चं सोडा, ‘खरेटिव्ह’वर बोला!

इंडिया आघाडीनं खोटं नरेटिव्ह सेट केल्याचा आरोप भाजप व एनडीएकडून केला जात आहे. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. ‘आम्ही खोटं नरेटिव्ह सेट केलं असं म्हणतात तर आमच्या विरोधात मोदी जे बोलत होते ते काय होतं? इंडिया आघाडीला मत दिलं तर ते तुमची संपत्ती जास्त मुलं असणाऱ्यांना वाटतील, तुमची मंगळसूत्रं घेऊन जातील. तुमच्या म्हशी घेऊन जातील. तुमच्या घरातले नळ कापून नेतील, वीज कापतील हे खरं नरेटिव्ह होतं. नकली संतान, नकली सेना हे खरं नरेटिव्ह होतं. प्रत्येकाला घर देईन, प्रत्येकाला नोकरी देईन, उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नरेटिव्ह होतं का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी दिला. हे नरेटिव्हचं सोडून द्या, खरेटिव्हवर बोला, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी केला.



Source link