राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका तीन टप्प्यात; मतदान २ डिसेंबरला

0
18
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका तीन टप्प्यात; मतदान २ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात पार पडण्याची शक्यता असून, राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व कार्यक्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

📅 निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

  • अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ७ नोव्हेंबर २०२५
  • उमेदवारी अर्ज दाखल : १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५
  • अर्ज छाननी : १८ नोव्हेंबर २०२५
  • अर्ज माघारीची मुदत : २१ नोव्हेंबर २०२५
  • चिन्ह वाटप : २६ नोव्हेंबर २०२५
  • मतदान : २ डिसेंबर २०२५
  • मतमोजणी : ३ डिसेंबर २०२५

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हा पहिला टप्पा असणार असून, उर्वरित टप्प्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.