
मिळालेल्या माहितीनुसार, आशिया विश्वकर्मा (वय, ९) असे बाल्कनीतून पडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. आशिया ही इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी असून आपल्या कुटुंबासोबत कांदिवली येथे भाड्याने राहत होती. मंगळवारी आशियाचे वडील मानसिंह विश्वकर्मा यांची तब्येत ठिक नसल्याने ते आराम करत होते. मात्र, अचानक त्यांना पुतण्यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी बाल्कनीत जाऊन पाहिले तर त्यांचे दोन्ही पुतणे तुटलेल्या ग्रीलला लटकले होते आणि आशिया गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसली. त्यांनी पटकन दोन्ही मुलांना वर काढले आणि तळमजल्यावर धाव घेतली. मानसिंहने तिला तातडीने बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास आशियाचा मृत्यू झाला.





