
बारामती: शेतकऱ्याची कॅमेऱ्यासमोर आत्महत्या
बारामती येथील लाटे गावातील एका शेतकऱ्याने कॅमेऱ्यासमोर आत्महत्या केली. हनुमंत सणस असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हनुमंत सणस यांनी संबंधित शेतकऱ्याने पाटबंधारे विभाग महावितरण विभाग आणि पोलिसांना यांच्यावर गंभीर आरोप करत विष प्राशन केले. याप्रकरणी हनुमंत सरण यांच्या थोरल्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्यापूर्वी हनुमंत सणस यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयासह उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांसह संबंधित कार्यालयांना निवेदन पाठवले. ज्यात सणस यांनी न्याय न मिळल्यास आत्महत्येचा इशारा दिला होता.





