Mumbai Weather Update : मुंबईत आज पावसाची स्थिती काय असणार?, पाहा हवामान अंदाज

0
19
Mumbai Weather Update : मुंबईत आज पावसाची स्थिती काय असणार?, पाहा हवामान अंदाज


मुंबईतील अंधेरी, बोरिवली, वांद्रे, मालाड, शिवाजीनगर, वरळी, कुलाबा आणि गोरेगाव या परिसरात दोन दिवसांपू्र्वीच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुढील २४ तासांत मुंबईसह ठाणे आणि उपनगरांच्या भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय सतत होत असलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच रुळांवर पाणी साचल्याने अनेक लोकल सेवाही खोळंबली होती.



Source link