
Mumbai water Cut : मुंबईत सध्या ५ टक्के आणि १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही पाणी कपात सुरू असतांना आता पाइपलाइन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत काही भागात गुरुवारी आणि शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी यांची दखल घ्यावी, व पाणी साठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिकेने दीलेल्या माहितीनुसार करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये ६, ७ जून रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.





