
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या बोरीवली येथे २४ मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या १६ व्या मजल्याभोवती बांधण्यात आलेली परात कोसळून चार कामगार जखमी झाले. त्यांना तातडीने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. तर, चौथ्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे.







