
२०२४ च्या पहिल्या सहामाहीत नोंदणीची सरासरी संख्या २०२३ च्या १२ महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक –
जूनमध्ये मुंबईतील मालमत्ता नोंदणीत वार्षिक वाढ झाली असली तरी पहिल्या सहा महिन्यांत सरासरी १२,०४४ युनिट्सची नोंदणी झाली आहे. जी २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांतील १०,५७८ युनिट्सच्या बारा महिन्यांच्या सरासरीपेक्षा जास्त होती. नाइट फ्रँक इंडिया या रिअल इस्टेट सल्लागाराच्या विश्लेषणानुसार, हे मुंबईच्या निवासी बाजारपेठेची ताकद आणि घर खरेदीदारांचा विश्वास दर्शविते.





