Mumbai Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद. वाहतूक मंदावली

0
19
Mumbai Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद. वाहतूक मंदावली


मुंबई : राज्यात काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. दरम्यान, आज मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतूक संथ गतीने पुढे जात असून काही ठिकाणी ट्राफिक जॅम देखील झाले आहे. पावसाचे पाणी सखल भागात साचायला लागले आहे. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे,वाहतूक विलेपार्ले पूल आणि कॅप्टन गोरे मार्ग एस. व्ही रोडकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.



Source link